BAMCEF UNIFICATION CONFERENCE 7

Published on 10 Mar 2013 ALL INDIA BAMCEF UNIFICATION CONFERENCE HELD AT Dr.B. R. AMBEDKAR BHAVAN,DADAR,MUMBAI ON 2ND AND 3RD MARCH 2013. Mr.PALASH BISWAS (JOURNALIST -KOLKATA) DELIVERING HER SPEECH. http://www.youtube.com/watch?v=oLL-n6MrcoM http://youtu.be/oLL-n6MrcoM

Welcome

Website counter
website hit counter
website hit counters

Friday, March 30, 2012

दिवेआगार दरोडा प्रकरण : युतीचे १४ आमदार वर्षभरासाठी निलंबित

दिवेआगार दरोडा प्रकरण : युतीचे १४ आमदार वर्षभरासाठी निलंबित



दिवेआगार दरोडा प्रकरण :
 युतीच्या आमदारांनी आज विधानसभा परिसरात सरकार विरोधात
जोरदार घोषणाबाजी केली. त्याची गंभीर दखल घेत शिवसेनेच्या तेरा व भाजपच्या एका
आमदाराला वर्षभरासाठी निलंबित करण्यात आले आहे. 
(छाया - प्रदिप कोचरेकर)

मुंबई , ३० मार्च २०१२
दिवेआगार गणेश मंदिरातील सोन्याची गणेशमुर्ती चोरीला गेल्याच्या घटनेला एक आठवडा उलटला असून, दरोखोरांना पकडण्यात सरकार अपयशी ठरले आहे. या घटनेचा निषेध करत शिवसेना आणि भाजप आमदारांनी आज विधानसभा परिसरात महाआरती करत, सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. विधानसभा अध्यक्षांनी याची गंभीर दखल घेत शिवसेनेच्या तेरा व भाजपच्या एका आमदाराला वर्षभरासाठी निलंबित केले आहे. निलंबित केलेल्या आमदारांमध्ये शिवसेनेचे प्रताप सरनाईक, महादेव दाबर, डॉ. बालाजी किणीकर एकनाथ शिंदे, विनोद घोसाळकर, विजय शिवतारे, चंद्रकांत मोकाटे, राजन विचारे, ज्ञानराज चौगुले, संजय गावंडे, अभिजीत अडसूळ, दौरत दरोडा, सुजित मिणचेकर आणि भाजपचे राम शिंदे यांचा समावेश आहे. 
दरम्यान निलंबनाच्या कारवाईचा एकनाथ शिंदे यांनी निषेध केला आहे. हा लोकशाहीचा खून असून, सरकारची दडपशाही असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. विधानसभेत आज राज्यकर्त्यांच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा चर्चेला येणार होता परंतू त्याला सामोरं न जाता विधिमंडळाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करणे हा सरकारचा पळपुटेपणा असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केला आहे.  

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...